महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा |अधिवास प्रमाणपत्र कसे मिळवायचे|

महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा|अधिवास प्रमाणपत्र कसे मिळवायचे.






अधिवास प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जे नागरिकाच्या निवासाचा पुरावा म्हणून काम करते. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना ते आवश्यक आहे. महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य करणाऱ्या व्यक्ती हा अधिवास प्रमाणपत्रासाठी पात्र ठरतो महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा? याकरिता खालील तपशील वाचावे.


महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा? : 


१) मित्रांनो सर्वात प्रथम aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.


२) ज्या व्यक्तीचे Domicile Certificate काढणार आहात त्या व्यक्तीचे सर्वात प्रथम अकाऊंट उघडायचे आहे (जर व्यक्ती Minor मध्ये असेल तर त्या व्यक्तीच्या आईवडिलांच्या नावाने अकांऊट उघडू शकता.)


३) अकाऊंट उघडण्याकरिता नवीन युजर? येथे नोंदणी करा या option वरती क्लिक करा, आधीच नोंदणीकृत असल्यास, तुमचा आयडी, पासवर्ड आणि सुरक्षा कोडसह लॉग इन करा.


४) त्यानंतर पर्याय १ या option वर क्लिक करा, पर्याय १ या option वर क्लिक केल्या नंतर, तुम्ही तुमचा जिल्हा Select करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि OTP पाठवा या Option वरती क्लिक करायचे आहे. दिलेल्या मोबाईल नंबर वरती तुम्हांला SMS च्या स्वरूपात OTP प्राप्त झालेला असेल तो OTP टाकून तुम्हांला Verify करायचे आहे आणि ज्या व्यक्तीचे तुम्हांला Domicile Certificate काढायचे आहे त्या व्यक्तींचेच Username Create करायचे आहे.


५) त्यानंतर तुम्हांला पासवर्ड / पूर्ण नाव (English)/ पूर्ण नाव (Marathi)/ जन्मतारीख / आणि वय टाकून नोंदणी करा या Option वरती क्लिक करायचे आहे. •Note (नाव आणि जन्मतारीख ही प्रत्येक डॉक्युमेंट वरती सारखी असणे गरजेचे आहे तरच Domicile Certificate काढता येऊ शकते)


६) तुम्ही जो Username आणि Password Create केला होता तो आणि सुरक्षा कोड व जिल्हा निवडून तुम्हांला लॉग इन या Option वरती क्लिक करायचे आहे.


७) लॉगइन केल्यानंतर सर्वात प्रथम उजव्या बाजूस असलेल्या English Option वर क्लिक करून English भाषा निवडा, त्यानंतर डाव्या बाजूस तुम्हांला भरपूर Options शो होतील हे Option Scroll Down करून तुम्हाला Revenue Department हे Option दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. 


८) क्लिक केल्यानंतर तुम्हांला Sub Department option मध्ये Revenue Service select करायचे आहे. तुमच्या समोर भरपूर प्रकाराचे Service Option शो होतील. option Scroll down करून तुम्हांला Age nationality & Domicile Certificate वर क्लिक करून Proceed option वर क्लिक करायचे आहे. पुन्हा Age nationality & Domicile Certificate हा option दिसेल त्यावर क्लिक करून, तुमच्या समोर Domicile काढण्याकरिता कोणकोणते Document लागणार आहे या माहितीचा interface तुम्हाला दिसेल, त्यानंतर Continue option वर क्लिक करायचे आहे.


९) Continue Option वर क्लिक केल्यानंतर, सर्वात प्रथम तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे.

१) Certificate Name→Certificate Name - 1 Certificate of age, Nationality and domicile (पर्याय २ ची निवड करायची आहे.)

२) Applicant Details मध्ये,

a) तुमचे पूर्ण नाव  b) तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव c) जन्मतारीख d) वय e) मोबाईल नंबर f) लिंग g) ईमेल आयडी h) Occupation i) आधारकार्ड नंबर j) Nationality माहिती भरल्यानंतर I Agree Option वर क्लिक करायचे आहे.


१०) सध्याच्या पत्त्यावर किती वर्षापासून राहत आहात, वर्ष Select करा.

Applicant Address मध्ये, तुमचा पूर्ण पत्ता टाका.


११) Beneficiary Details मध्ये, ज्या व्यक्तीच्या नावाच Domicile Certificate काढायचे आहे त्याच व्यक्तीची माहिती Beneficiary Details मध्ये भरावी.


१२) Birth Details मध्ये, सध्याच्या पत्यावर तुमचा जन्म झाला असेल तर Yes करा नसेल झाला असेल तर No Option वर क्लिक करून जन्म झालेल्या ठिकाणाची माहिती भरावी.


१३) Education Details of Beneficiary मध्ये शैक्षणिक माहिती भरावी.


१४) Has beneficiary migrated from a different state मध्ये, तुम्ही जर इतर राज्यात राहिले असाल तर Yes वर क्लिक करा नसेल तर No वर क्लिक करा. 

a) Migration Details मध्ये, जर तुम्ही इतर राज्यात राहिला असाल तर खालील माहिती भरावी.


१५) Whether applicant is beneficiary of government scheme in other district?  मध्ये, तुम्ही इतर जिल्ह्यांतील शासकीय योजनेचा लाभ घेतला असेल तर Yes करा आणि घेतलेल्या योजनेबद्दल व कोणत्या जिल्ह्यांतून घेतली याबद्दलची माहिती भरावी. नसेल घेतल्यास No Option वर क्लिक करावे.


१६) Certificate मध्ये, कोणत्या कारणांसाठी लागणार आहे हे टाकावे.


१७) Agreement मध्ये, I Agree वर क्लिक करून Save बटणावरती क्लिक करावे.


१८) तुमच्या समोर अशा पद्धतीचा Pop-up येईल या स्टेप नंतर प्रमाणपत्रामधील कुठलीही माहिती दुरुस्त होणार नाही याची नोंद घ्यावी तरी कृपया प्रमाणातील माहिती करून सर्व दुरुस्ती आत्ताच करून घेणे हे वाचून Ok Option वर क्लिक करा, त्यानंतर तुमची Applicant I'd Generate होईल.


१९) त्यानंतर तुम्हांला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत.

a) Photo b) Proof of Identify मध्ये दिलेल्या Option पैकी कोणतेही एक Option Select करावे. c) Proof of Address मध्ये दिलेल्या Option पैकी कोणतेही एक Option Select करावे. Other Document मध्ये दिलेल्या Option पैकी कोणतेही एक Option Select करावे. Age Proof मध्ये दिलेल्या Option पैकी कोणतेही एक Option Select करावे. Resident Proof मध्ये दिलेल्या Option पैकी कोणतेही एक Option Select करावे. Mandatory Document मध्ये Other Option मध्ये तुम्ही शैक्षणिक संबंधित डॉक्युमेंट अपलोड करू शकता त्याचबरोबर Self Declaration मध्ये तुम्ही सर्वप्रथम Self Declaration डाऊनलोड करून तो भरून अपलोड करावा.  त्यानंतर Document Upload या Option वर क्लिक करावे.


२०) Document Upload झाल्यानंतर Payment करावी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजच आपल्या Telegram Channel ला जॉईन व्हा.                                              


Telegram ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणी पोस्ट करा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने