पॅन कार्ड आधारशी कसे लिंक करावे.|आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक आहे की नाही कसे तपासायचे.|
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे हे प्रत्येक नागरिकांसाठी बंधनकारक केले आहे. तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे जाणून घेणं देखिल तितकंच महत्त्वाचं आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे, आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक आहे की नाही कसे तपासायचे, लिंक करण्याची शेवटची तारीख काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी खालील तपशील वाचा.
How Do I link Pan Card With Aadhar ( पॅन कार्ड आधारशी कसे लिंक करावे.)
• पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी w.w.w.incometax.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.
• संकेत स्थळ ओपन होताच "Quick Links" मध्ये "Link Aadhar" या ऑप्शन वर क्लिक करा.
• तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून Link Aadhar या बटणावर क्लिक करा.
• आता रु. १००० रक्कम भरावी लागेल.
• त्यानंतर परत w.w.w.incometax.gov.in या संकेतस्थळावर या, आणि परत “Link Aadhar” या पर्यायावर क्लिक करा.
• पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून Link Aadhar या बटणावर क्लिक करा.
• पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक किंवा दोन दिवस वाट पहावी लागू शकते.
• पेमेंट केल्यानंतर व्हेरिफिकेशन करता वेळ लागू शकतो, एकदा पेमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर Link Aadhar या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.
...............................................................
How to check whether Pan card is linked with Aadhaar card or not? (आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक आहे की नाही कसे तपासायचे.)
• पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही पाहण्यासाठी w.w.w.incometax.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.
• संकेत स्थळ ओपन होताच "Quick Links" मध्ये "Link Aadhar Status" या ऑप्शन वर क्लिक करा.
• त्यानंतर पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून View Link Aadhar Status या बटणावर क्लिक करा.
• बटणावर क्लिक करताच तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे सांगितले जाईल.
................................................................
Pan card Link to Aadhar card Last Date Extended (पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली)
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या तारखेमध्ये मुदत वाढ करण्यात आली आहे. ज्याही आधार कार्ड आणि पॅन कार्ड धारकांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक झाले नसेल त्यांकरिता आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता ३० जून २०२३ मा तारखेपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. तुम्ही अजूनही पॅन कार्ड आधारकार्ड शी लिंक केल नसेल तर लवकरात लवकर लिंक करा.
................................................................
विभाग (Department) | Income tax |
अधिकृत संकेतस्थळ (Official Website) | w.w.w.incometax.gov.in |
शेवटची तारीख(Last Date) | 30 जून/June 2023 |
हेल्पलाईन नंबर (HelpLine Number) | १८०० १८० १९६१/१९६१ |
पॅन कार्ड लिंक आधार कार्ड शुल्क (Linking Pan With Aadhar Fee) | Rs.१०००/- |
पॅन कार्ड लिंक आधार कार्ड लिंक करण्याचे मोड (Pan Aadhar link mode) | Online |
...............................................................
आजच आपल्या Telegram Channel जॉईन व्हा : Click Here
...............................................................